
Shreyas Talpade & Prarthana Behere New Project
माझी तुझी रेशीमगाठ (2021–2023) ही झी मराठीवरील मालिका श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि मायरा वायकुळ यांच्या अभिनयामुळे प्रचंड गाजली आणि टीआरपीत नंबर 1वर होती.
मालिकेचा सिक्वेल यावा अशी प्रेक्षकांची मागणी बराच काळ होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि दिग्दर्शक अजय मयेकर हे श्री स्वामी समर्थांच्या मठातून स्क्रिप्टसदृश कागदाचा गठ्ठा घेऊन बाहेर पडताना दिसले, त्यामुळे सिक्वेलच्या चर्चेला उधाण आले आहे.