

Siddharth Chandekar Old Interview Viral
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सगळ्यांचं लाडकं कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला पाच वर्षं पूर्ण झाली. सिद्धार्थने आजवर अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलंय पण मिताली फार मोजक्या कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामागचं कारण आणि मितालीने तिच्या करिअरला दिलेली नवी दिशा यावर सिद्धार्थने एका जुन्या मुलाखतीत भाष्य केलं होतं.