
Marathi Entertainment News : दिवाळीच्या उत्साहात अधिक रंग भरायला सज्ज झालेला चित्रपट म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट २’! लव्हस्टोरींचे बादशहा दिग्दर्शक सतीश राजवाडे, दमदार तरुण कलाकार, नेत्रदीपक व्हीएफएक्स आणि रोमँसचा नवा अंदाज या सगळ्यामुळेच सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. त्यातच गौतमी पाटील हिचं थिरकायला लावणारं ठसकेबाज नृत्य या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण ठरतंय.