
Entertainment News : टीव्ही इंडस्ट्रीमधील एक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट. गुम है किसी के प्यार में या मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या या जोडीने नंतर खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. पण ही जोडी सध्या चर्चेत आली आहे ती घटस्फोटाच्या चर्चांमुळे. गेल्या काही दिवसांपासून नील आणि ऐश्वर्याचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अखेर ऐश्वर्या शर्माने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर तिने याबद्दल संताप व्यक्त केला.