अमृता धोंगडेचा हटके लूक अन् हितेश मोडक यांच्या सुरांची जादू; ‘आली लखाबाई’ गाण्याची चर्चा

Amruta Dhongade New Song : अभिनेत्री अमृता धोंगडेचं आली लखाबाई हे नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. जाणून घेऊया या नव्या गाण्याविषयी.
Amruta Dhongade New Song

Amruta Dhongade New Song

esakal

Updated on

Entertainment News : मराठी संगीतविश्वात लोकसंगीताचा गोडवा आणि आधुनिक सादरीकरणाचा सुरेख संगम घडवणारं नवीन गाणं ‘आली लखाबाई’ नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे हिचा मोहक अभिनय आणि नृत्याने सजलेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार हितेश मोडक यांनी सुरेल संगीत दिलं आहे. अल्पावधीतच हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. अवघ्या काही तासांत हजारोंच्या घरात हे गाणं पाहिलं गेलं. ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपत, उत्सवमय वातावरण आणि पारंपरिक लोककलेचा रंग या गाण्यात अनुभवायला मिळतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com