

Amruta Dhongade New Song
esakal
Marathi Entertainment News : “प्रेमाची सुरुवात जात पाहून होत नाही, पण प्रेम निभावण्याची वेळ आली की जात वेगळी आहे म्हणून समोरून त्या प्रेमाचा शेवट केला जातो", या संवादाने 'राजा राजा' या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता आयुष संजीव अभिनीत 'राजा राजा' या गाण्याचा लक्षवेधी टीझर समोर आला आहे. अर्थात टिझरने संपूर्ण गाण्याची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. इतकंच नाहीतर या गाण्याच्या संगीताने ही साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. संगीतकार हितेश मोडक यांचे संगीत असलेलं हे गाणं तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.