
अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38 व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं आणि तिच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला.
तिच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक मित्र-मैत्रिणी उपस्थित होते, तर अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही सोशल मीडियावर पोस्ट करून भावना व्यक्त केल्या.
पवित्र रिश्तामधून अंकिता आणि प्रियाची खास मैत्री झाली होती, प्रार्थना बेहेरेसोबत त्यांची छोटी गँग असून त्यांचा बंध अतिशय स्पेशल होता.