
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एकेकाळच्या दिग्गज अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजे चारुशीला साबळे वच्छानी. चारुशीला यांनी तरुणपणी मराठी सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी अजित वच्छानी यांच्याबरोबर लग्न केलं. पण त्यानंतर चारुशीला यांनी सिनेमांमध्ये काम केलं नाही. अजित यांच्या जाण्यानंतर त्यांनी मालिकेत काम केलं पण त्या कधीच त्यांचा भाचा असलेल्या केदार शिंदेंच्या सिनेमात दिसल्या नाहीत. याचं कारण त्यांनी नुकतंच उघड केलं.