Usha Uthup : गायिका उषा उथुप यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Singer Usha Uthup Husband Passed Away : गायिका उषा उथुप यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
Usha uthup
Usha uthup

Usha Uthup : पद्मविभूषण विजेत्या उषा उथुप यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या पतीचं नाव जानी चाको उथुप असं आहे. घरी टीव्ही पाहत असताना ही घटना घडली.

कोलकातामधील राहत्या घरी ही घटना घडली. ते घरी टीव्ही पाहत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यांनी तशी तक्रार कुटूंबाजवळ केली. त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून कुटुंबियांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जानी यांचं वय 78 वर्षं होतं.

Usha uthup
Usha Naik : 'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी अन् कुलकर्णी असतं तर....' प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाईक काय बोलून गेल्या?

जानी चाको उथुप हे चहा उत्पादनाच्या क्षेत्रात काम करायचे. जानी आणि उषा यांना एक मुलगा सनी आणि मुलगी अंजली ही दोन अपत्ये आहेत. उषा उथुप यांच्या पतीवर आज मंगळवारी 9 जुलैला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी उषा, मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

Usha uthup
Usha Nadkarni: इतका मोठा नट पण मांडी घालून... विजय सेतुपतीचं उदाहरण देत उषा नाडकर्णींची मराठी कलाकारांवर टीका

उषा यांची जानी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. या आधी उषा यांचं लग्न रामू अय्यर यांच्याशी झालं होतं पण हे जोडपं 5 वर्षांमध्येच विभक्त झालं. 70 च्या दशकात जानी आणि उषा यांची भेट झाली. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पहिल्या घटस्फोटानंतर उषा यांनी जानी यांच्याशी लग्न केलं.

उषा या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. 'एक दोन तीन चार' हे त्यांचं गाणं गाजलं होतं. आर डी बर्मन, बप्पी लहरी या संगीतकारांबरोबर त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली. उषा यांनी 1960 आणि 70च्या दशकांत त्यांनी अनेक पॉप गाणी गायली आहे. या गाण्यांसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे.

त्यांचे 'अब के सावन','डार्लिंग','दम मारो दम', ‘मेहबूबा’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘रंबा’, ‘कोई यहाँ आहा नाचे नाचे’ तसेच ‘नाका बंदी’ ही त्यांची गाणी खूप गाजली होती.

Usha uthup
Usha Mangeshkar Birthday: 'या' गाण्यामुळे उषा मंगेशकर रातोरात स्टार बनल्या..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com