
Entertainment News : मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही सध्या स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक. शाहरुख बरोबर जवान सिनेमात स्क्रीन शेअर केल्यावर गिरीजा चर्चेत आली. याबरोबरच जाहिरात क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणूनही तिने ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय आहे. पण नुकत्याच तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिचे चाहते चिंतेत आहेत.