

Entertainment News : अभिनेत्री कंगना रनौतची मुख्य भूमिका असलेला भारत भाग्य विधाता हा सिनेमा 12 जूनला रिलीज होतो आहे. 26/11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान घटनांवर हा सिनेमा आधारित आहे. अतिरेक्यांनी कामा रुग्णालयात केलेला हल्ला आणि त्यावेळी तेथील स्टाफने रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी केलेली शिकस्त याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.