

madhoo shah
esakal
'लगान', 'मुन्नाभाई एमबीबीएस' मधून आपली एक वेगळी छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री मधु शाह आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी 'रोजा' या चित्रपटातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र आता मधू यांनी नुकताच एक खुलासा केलाय. नाना पाटेकर आणि मधू यांनी १९९७ मध्ये 'यशवंत' या चित्रपटात काम केलेलं. चित्रपटात मधू यांनी नानांच्या पत्नीची भूमिका साकारलेली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मधू यांनी नाना पाटेकर यांच्या कानाखाली लगावलेली. पण त्यांनी असं का केलं याबद्दल देखील त्यांनी सांगितलंय.