कभी खुशी कभी गम या चित्रपटात लहानपणीची "पू" साकारणारी अभिनेत्री मालविका राज आता आई झाली आहे.तिने 23 ऑगस्ट रोजी बाळाला जन्म दिला.ही आनंदाची बातमी मालविकाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली..Marathi Entertainment News : बॉलिवूडमध्ये या वर्षात अनेक कलाकारांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आई झाली. कभी ख़ुशी कभी गम या गाजलेल्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीने बाळाला जन्म दिला. सोशल मीडियावर तिने ही आनंदाची बातमी शेअर केली. .ही अभिनेत्री आहे मालविका राज. मालविकाने कभी ख़ुशी कभी गम या सिनेमात करीना कपूरने साकारलेल्या पू या पात्राच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 23 ऑगस्टला शनिवारची मालविकाने बाळाला जन्म दिला. सोशल मीडियावर तिने ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. .मालविकाने एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणते,"आमच्या हृदयातून आमच्या हातात येईपर्यंत ... आमची गोंडस मुलगी.." तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं. मालविका आता 34 वर्षांची आहे. .काही महिन्यांपूर्वी मालविकाने सोशल मीडियावर प्रेग्नेंसीचे फोटो शेअर करत बातमी जाहीर केली होती. अनेकांनी तेव्हा तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. आताही मालविकाने शेअर केलेल्या बातमीमुळे सगळे आनंदी आहेत. .2023 मध्ये मालविकाने प्रियांका मित्तलसोबत लग्न केलं. लग्नाच्या 2 वर्षांनी त्या आई झाल्या. लग्नाच्या २ वर्षांनी ती आई झाली. कभी ख़ुशी कभी गम सिनेमात बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिने कॅप्टन नवाब, स्वाईप क्राईम या प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं. .FAQs : Q1. मालविका राज कोणत्या सिनेमात दिसली होती?👉 कभी खुशी कभी गम मध्ये लहानपणची "पू" (करीना कपूरच्या भूमिकेचं बालपण).Q2. मालविकाने बाळाला कधी जन्म दिला?👉 23 ऑगस्ट रोजी.Q3. ही माहिती चाहत्यांपर्यंत कशी पोहोचली?👉 मालविकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी शेअर केली.Q4. मालविका राजचा बॉलिवूड करिअर कशामुळे लक्षात राहिला?👉 "पू" या गाजलेल्या पात्राच्या बालपणाची भूमिका केल्यामुळे.Q5. या वर्षात आणखी कोणत्या कलाकारांच्या घरी बाळाचा जन्म झाला आहे?👉 या वर्षी अनेक बॉलिवूड कलाकारांना पालकत्वाचा आनंद लाभला असून ही यादी सातत्याने वाढत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.