'ठरलं तर मग' मालिका नेहमी चर्चेत असते. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येताना पहायला मिळताय. दरम्यान साक्षी आणि प्रियाचा खरा चेहरा उघड करण्यासाठी अर्जुन आणि सायलीचा कोर्टाचा लढा दाखवण्यात येत आहे. तर कॉन्ट्र्र्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आल्यानं सुभेदार मंडळीची त्यांनी बोलणं बंद केल्याचं दाखवण्यात आलंय. आता मालिकेत पुन्हा जुन्या अभिनेत्री येणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.