झी मराठीवर निवेदिता सराफ यांचं कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार 'आई'ची भूमिका, प्रोमो Viral

NIVEDITA SARAF RETURNS TO ZEE MARATHI: लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ झी मराठीवरील या मालिकेतून पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. मालिकेत त्या खंबीर आईची भूमिका साकारताना दिसणार असून भावनिक प्रोमोने सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
NIVEDITA SARAF

NIVEDITA SARAF

esakal

Updated on

ZEE MARATHI’S NEW SHOW KRISHNAI CHYA LEKI: झी मराठी वाहिनीवर सध्या मालिकांमध्ये अनेक बदल पहायला मिळताय. टीआरपी टिकून ठेवण्यासाठी मालिकेच्या वेळा बदलल्या जाताय, तर कधी मालिकेत नवीन पात्र आणले जाताय. तर कधी वाहिनी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येताय. अशातच काही दिवसापूर्वी झी मराठीने कृष्णाईच्या लेकी या मालिकेची घोषणा केली होती. या मालिकेत कोणते कलाकार असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. दरम्यान या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर कमबॅक होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com