Premier
एकेकाळी अंकिता लोखंडेलाही प्रियाने दिलेली टक्कर; पवित्र रिश्तामधील गाजलेली भूमिका ते दमदार खलनायिका
Priya Marathe Journey : अभिनेत्री प्रिया मराठेचं आज पहाटे निधन झालं. एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने ओळख कमावली. अभिनय क्षेत्रातील तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दमदार अभिनेत्री प्रिया मराठेच आज 31 ऑगस्टला निधन झालं. गेला काही काळ ती कर्करोगाशी झुंजत होती. एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिच्या अकस्मात निधनाने चाहते आणि मराठी इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला आहे.

