

SHILPA SHINDE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील काही मालिका या कधीही प्रेक्षकांच्या विस्मरणात जात नाहीत. या मालिकांमधील कलाकार कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. सोबतच या मालिकेचं कथानक देखील प्रेक्षकांच्या मनात घर करतं. असे कलाकार मालिका सोडून गेले तर मालिकेचं खूप जास्त नुकसान होतं. त्या कलाकाराच्या जागी दुसऱ्याला पाहणं प्रेक्षकांना अवघड जातं. अशीच एक कलाकार जिने तिच्या भूमिकेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. तिच्यामुळे त्या मालिकेला शोभा होती. मात्र वर्षभरातच तिने ती मालिका सोडली. ही कलाकार म्हणजे शिल्पा शिंदे. आता शिल्पा त्याच मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.