
Marathi Entertainment News : सध्या फॅन्ड्री सिनेमातील शालू या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चर्चेत आहे ते तिच्या व्हायरल झालेल्या धर्मांतराच्या फोटोमुळे. ईस्टर रविवारी तिने तिच्या धर्मांतराचे फोटो शेअर केले. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. फक्त राजेश्वरीच नाही तर तिच्या कुटूंबियांनी आणि मित्रांनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं या फोटोमध्ये दिसून आलं. यामुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली.