बेशुद्धावस्थेतील राखीचा हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल ! नेमकं झालं काय?

Rakhi Sawant get hospitalised : अभिनेत्री राखी सावंतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती बरी नसून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
Rakhi sawant
Rakhi sawant Esakal

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने सोशल मीडियावरही स्वतःचं स्थान निर्माण केलंय. कायम प्रसिद्धीच्या झोतात वावरणारी राखी कायमच काही न काही कारणांमुळे चर्चेत असते.

कायमचं वादग्रस्त कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या राखीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राखीला हृदयाशी संबधित गंभीर आजार असल्याचं म्हंटलं जातंय. हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या राखीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की ती बेशुद्ध किंवा गाढ झोपेत आहे. नर्स तिचं ब्लडप्रेशर तपासत आहे तर मशिनद्वारे तिचा ईसीजीही तपासला जातोय. डॉक्टरांनी तिला हृदयाचा गंभीर आजार असल्याचा खुलासा केला असून तिला नेमकं काय झालंय ते अजून उघड केलं नाहीये. शिवाय तिच्या टीमकडून देखील याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाहीये.

टाईम्स नाऊने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना राखीने त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. "मला हृदयाशी संबंधित त्रास आहे. हे समजून घ्या... मी आता हॉस्पिटलमध्ये बोलू शकत नाही, म्हणून मला आता कॉल करू नका" असं उत्तर तिने त्यांना दिलं.

या आधीही राखीला बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे. राखीचं काही काळापूर्वी पोटाचं ऑपरेशन पार पडलं. राखीच्या गर्भाशयाच्यावर एक गाठ होती त्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या. ऑपरेशन करून ही गाठ काढून टाकण्यात आली. जवळपास चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना तिची काळजी वाटत असून अनेकां तिची प्रकृती बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

राखी गेला बराच काळ दुबईमध्ये होती. काही कामानिमित्त ती दुबईमध्ये होती असं तिने मीडियाला सांगितलं. तिथे तिने टिक टॉक साठी काम केल्याचाही खुलासा केला. आदिल दुर्रानी विरोधातील घटस्फोटाची केस तिची अजून सुरू असून ती सध्या तिचा आधीच नवरा रितेश सोबत सतत दिसतेय. दुबईला सुद्धा ती रितेश सोबत गेली होती.

Rakhi sawant
Supreme Court On Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा दणका! चार आठवड्यात सरेंडर करण्याचे दिले निर्देश

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com