
Bollywood News : बॉलिवूडचा बादशाह शाहरुखच्या आगामी किंग या सिनेमाची चर्चा सगळीकडेच आहे. जवान आणि डंकीनंतर बऱ्याच काळाने शाहरुख एका वेगळ्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेमाची घोषणा होण्याच्या आधीपासूनच या सिनेमाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. लवकरच सिनेमाचं शूटिंग सुरु होणार आहे. त्यातच आता एक नवीन अपडेट सिनेमाविषयी समोर आली आहे.