Rutuja Bagwe : ऋतुजाचं हिंदी मालिकाविश्वात पदार्पण ; 'या' मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

Rutuja Bagwe debut on Hindi television : अभिनेत्री ऋतुजा बागवे हिंदी मालिकाविश्वात पदार्पण करतेय. जाणून घेऊया तिच्या नवीन मालिकेविषयी.
Rutuja Bagwe debut in hindi serial
Rutuja Bagwe debut in hindi serial

Rutuja Bagwe : 'नांदा सौख्य भरे', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत मराठी नाट्य आणि सिनेविश्वातही स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे बऱ्याच काळाने मालिकांमध्ये कमबॅक करतेय.

पण ऋतुजा मराठी नाही तर हिंदी मालिकेत काम करणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून ती हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करतेय.

स्टार प्लसवरील 'माटी से बंधी डोर' या नव्या मालिकेत ऋतुजा काम करत असून यात ती वैजू ही मुख्य भूमिका साकारणार आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार ती या मालिकेत वैजू ही मुख्य भूमिका साकारतेय. तर तिच्या सोबत हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीचा अभिनेता अंकित गुप्ता स्क्रीन शेअर करणार आहे. तो या मालिकेत रणविजय ही भूमिका साकारणार आहे.

ऋतुजा या मालिकेत शेती करून घर सांभाळणाऱ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारणार असून अंकित एका श्रीमंत तरुणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं नुकत्याच एबीपी न्यूजने शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. आता या मालिकेतून नेमकी कोणती कथा प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे जाणून घेण्यास सगळेचजण उत्सुक आहेत.

Rutuja Bagwe debut in hindi serial
Antarpaat Colors Marathi Serial : अभिनेत्री रश्मी अनपट दिसणार 'अंतरपाट' मालिकेत; प्रोमोची होतेय चर्चा

"मी कित्येक दिवसापासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. नाटक-सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते, पण पुन्हा मालिका करावीशी वाटत होती. पडद्यावर सतत दिसणं ही कलाकारांची गरज झाली आहे. मालिका हे माध्यम कलाकाराला खूप काही देत असत. बाहेरून सोपं वाटणारं हे माध्यम आम्हा कलाकारांसाठी आव्हानात्मक असतं. सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, पण वेगळ्या भूमिका साकारायला मिळायला हव्या, असं वाटत असताना या मालिकेविषयी विचारणा झाली. दिग्दर्शक, कथा आणि भूमिका यांचा विचार करून मालिका स्वीकारली." असं ऋतुजाने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. या मालिकेचं दिग्दर्शन भीमराव मुडे करत आहेत.

ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार? यात अजून कोण कलाकार काम करत आहेत? हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. लवकरच ही मालिका स्टार प्लसवर प्रसारित होणार असून 'इमली' ही मालिका ऑफ एअर जाणार असल्याची चर्चा आहे.

Rutuja Bagwe debut in hindi serial
ऋतुजा सिंगल आहे की रिलेशनशीपमध्ये? इथे आहे उत्तर Rutuja Bagwe

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com