Salman Khan: सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत जीवन संपवण्याचा प्रयत्न, कोण आहे अनुज थापन?

Who is Anuj Thapan: आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अनुज थापन असं या आरोपीचं नाव आहे.
Salman Khan
Salman Khanesakal

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अनुज थापन असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी अनुज थापनची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती मिळत आहे.

कोण आहे अनुज थापन?

काही दिवसांपूर्वी जिवंत काडतुसे आणि दोन पिस्तुले पुरवल्याप्रकरणी अनुज थापनला दक्षिण पंजाबमधून अटक करण्यात आली होती. अनुजचा बिष्णोई टोळीशी संबंधित होता. तो ट्रकवर मदतनीस म्हणून काम करत होता.

14 एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर दोन व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना अटक केली.

एकनाथ शिंदेंनी घेतली होती सलमानची भेट

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल.हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू."

विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोन आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही बिहारमधील चंपारण येथील रहिवासी आहेत.

तापी नदीत सापडली बंदुक

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक सुरतमधील तापी नदीमध्ये सापडली. यावेळी काही जिवंतकाडतूसही सापडलं. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या तरुणांनी चौकशीदरम्यान सांगितले होते की, सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर ते मुंबईहून रस्त्याने सुरतला पोहोचले होते. येथून तो रेल्वेने भुजला गेला, तेथे प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे पुलावरून पिस्तूल तापी नदीत फेकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com