Viral: 'माझं सर्वस्व तूच आहेस!' सागरिका घाटगेंनी पहिल्यादाच दाखवला मुलाचा चेहरा, जहीर खानसोबत शेअर केला खास फोटो
SAGARIKA GHATGE SHARES SON FATEHSINGH'S FIRST PHOTO VIRAL : अभिनेत्री सागरिका घाटगेंनी सोशल मीडियावर मुलाचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या बाळाचा आणि जहीर खानचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
SAGARIKA GHATGE SHARES SON FATEHSINGH'S FIRST PHOTO esakal
बॉलिवूड अभिनेत्री आणि चक दे इंडिया फेम सागरिका घाटगेंने तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे. तिनं आपल्या मुलाचा म्हणजेच फतेहसिंह खानचा चेहरा पहिल्यांदाच चाहत्यांना दाखवला आहे. सध्या फतेहसिंह याचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.