

Ketaki Mategaonkar Praised Movie Rubab
esakal
Marathi Entertainment News : नुकताच झी स्टुडिओजचा ‘रुबाब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रेक्षक चित्रपटाच्या कथेची, कलाकारांची व दिग्दर्शकांची प्रशंसा करत आहेत. सिनेसृष्टीकडूनही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असून गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकरने ‘रुबाब’ पाहून समाधान व्यक्त केले आहे.