25 Years of Sarfarosh : आमिरची आपुलकी आणि सोनालीची गळाभेट; 25 वर्षांनंतर 'सरफरोश'च्या टीमला भेटून सुकन्या भारावल्या

Sarfarosh Team Reunion : सरफरोश टीमला 25 वर्षं पूर्ण झाल्याने सिनेमाचं रियुनियन थाटात पार पडलं. यावेळी सुकन्या मोने आमिर आणि सोनालीला भेटून भारावून गेल्या.
Sarfarosh Team Reunion
Sarfarosh Team Reunion

1999 साली रिलीज झालेल्या सरफरोश या सिनेमाची क्रेझ अजूनही टिकून आहे. आमिर खान, सोनाली बेंद्रे, नासिरुद्दीन शाह यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला होता. या सिनेमाला नुकतीच २५ वर्षं पूर्ण झाली. यानिमित्त रेडिओ नशा तर्फे सिनेमाच्या टीमचं रियुनियन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती.

या सिनेमात आमिरच्या वहिनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही हजेरी लावली. यावेळी संपूर्ण टीमला भेटून सुकन्या भारावल्या.

सुकन्या यांची खास पोस्ट

सोशल मीडियावर सुकन्या यांनी खास पोस्ट लिहीत सिनेमाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. त्या म्हणाल्या,"कालचा दिवस खास होता.... माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडतं होते.... आपण एखादा सिनेमा करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो.... पण ' सरफरोष ' हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे.आमिर खान माझा लाडका अभिनेता त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती. माझी आणि जॉन Mathew matthan ची पहिली भेट... दिल्लीतले चित्रीकरण.... माझी,सोनालीची आणि स्मिता जयकर ची झालेली घट्ट मैत्री... आम्ही केलेली धमाल.... त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्या निमित्तानेरेडिओ नशाने ठेवलेला खास show.... Thank you so much रो टॉक्स .... त्यानिमित्ताने झालेलं re union.... सगळ्या जुन्या आठवणी.... शूटिंग दरम्यान झालेल्या गमती जमती.... इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी ... आमिर चे मराठी बोलण,वागण्यातला आपलेपणा,काळजी... मनोज जोशी ची भेट....जॉन आणि आभा चे अगत्याचे आमंत्रण.... जॉन चां साधेपणा... त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा... भारवून गेले होते. .... पुन्हा पुन्हा भेटत राहू"

सोबत त्यांनी सिनेमाचे दिग्दर्शक जॉन, सोनाली बेंद्रे आणि आमिर खान यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत सुकन्या यांचं अभिनंदन केलं आणि सरफरोश सिनेमा त्यांनाही खूप आवडतो असं म्हंटल. सरफरोशमध्ये सुकन्या यांची छोटीशी पण महत्त्वाची भूमिका सगळ्यांना आवडली होती.

नवऱ्याच्या निधनानंतर खचलेली, स्वतःच्या दिरावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारी वहिनी सगळ्यांना आवडली होती. त्यांची आणि आमिर खानमधील केमिस्ट्री सगळ्यांच्या लक्षात राहिली होती.

Sarfarosh Team Reunion
Sukanya Mone - Sanjay Mone: "तर आपण एकमेकांना विसरुन जाऊ", लग्नापुर्वीच संजय मोनेंनी सुकन्याला सांगून टाकलं

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com