
Marathi Entertainment News : अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चर्चेत आहे तिच्या नव्या मालिकेमुळे. तेजश्री आणि सुबोध भावे यांची झी मराठीवर लवकरच नवीन मालिका येणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर त्या दोघांनी त्या दोघांच्याही गाजलेल्या मालिकांची नाव शेअर करत त्यांची मालिका येत असल्याची हिंट दिली. तिचे चाहते या बातमीमुळे खुश असतानाच तेजश्रीने तिच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे.