अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे ही एक उत्तम अभिनेत्री आहे. 27 डिसेंबर रोजी उर्मिला कानिटकर-कोठारे हिचा अपघात झाला होता. या अपघातात उर्मिला आणि तिच्या डायव्हरला गंभीर दुखापत झाली होती. तिच्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दोन मजुरांना धडक दिली होती. यामध्ये एका मजूराचा मृत्यू झाला होता, तर एकजण गंभीर जखमी झाला होता. दरम्यान उर्मिलाने या सर्व घटनेचा घटनाक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे.