
सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांमध्ये आणि जगभरातील मराठी प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.
कार्यक्रमातील कलाकार वनिता खरात, ओंकार राऊत आणि श्याम राजपूत यांनी सकाळ प्रीमियरच्या कार्यालयात भेट दिली.
या वेळी वनिता आणि ओंकार यांनी त्यांना आलेले चाहत्यांचे हृदयस्पर्शी अनुभव मुलाखतीत शेअर केले.