Mother's Day 2024: नर्गिस ते अनुष्का; लहान वयात सिनेमात आईची भूमिका गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

Mother's Day Special: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लहान वयात त्यांच्याच वयाच्या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली आहे. जाणून घेऊया अशा अभिनेत्रींविषयी.
Mother's Day 2024: नर्गिस ते अनुष्का; लहान वयात सिनेमात आईची भूमिका गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

आज 12 मेला संपूर्ण जगभरात मदर्स डे साजरा करण्यात येतो. आयुष्यभर मुलांसाठी कष्ट करणारी, त्यांच्यावर प्रेम करणारी आई हिला  आजचा दिवस समर्पित असतो. मुलांसाठी आईने केलेल्या त्यागाच्या अनेक कथा लोकप्रिय आहेत व बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींनी साकारलेल्या आईच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

नर्गिस दत्त

नर्गिस या बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री होत्या. त्यांचं करिअर यशाच्या शिखरावर असताना त्यांनी मदर इंडिया या सिनेमात सुनील दत्त या त्यांच्याच वयाच्या सहकलाकाराच्या आईची भूमिका साकारली. त्यांचा हा सिनेमा सुपरहिट झाला तर नर्गिस यांच्या भूमिकेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पुढे दोन वर्षांनी नर्गिस आणि सुनील दत्त यांनी लग्नही केलं.

रीमा लागू

अभिनेत्री रीमा लागू या त्यांच्या कमाल अभिनयासाठी ओळखल्या जायच्या. रीमा यांनी वास्तव या सिनेमात संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली. यावेळी त्या दोघांचे वय जवळपास सारखं होतं. तर 'हम आपले है कौन', 'हम साथ साथ है' या सिनेमात त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने थोडाच लहान असलेल्या सलमानच्या आईची भूमिका साकारली होती.

रोहिणी हट्टंगडी

दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहिणी यांनी आजवर अनेक कलाकारांच्या आईची भूमिका साकारलीये. धर्मेंद्र ते अमिताभ बच्चन या बॉलिवूड मधील बहुतेक कलाकारांच्या त्या आई झाल्या आहेत. अग्निपथ या सिनेमात त्यांनी साकारलेली अमिताभच्या आईची भूमिका सगळ्यांना आवडली होती. त्या अमिताभपेक्षा वयाने लहान असूनही त्यांनी त्यांच्या आईची भूमिका साकारण्याचं चॅलेंज स्वीकारलं.

शेफाली शाह

सध्या आघाडीची अभिनेत्री असलेल्या शेफाली शाह हिनेही अनेक कलाकारांच्या आईची भूमिका साकारलीये. वक्त या सिनेमात शेफालीने तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या अक्षयकुमारच्या आईची भूमिका साकारली होती. तर दिल धडकने दो या सिनेमात तिने तिच्यापेक्षा काहीच वर्षं लहान असलेल्या प्रियांका आणि रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती.

अनुष्का शेट्टी

साऊथची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. बाहुबली सिनेमात अनुष्काने प्रभासने साकारलेल्या महेंद्र बाहुबली या भूमिकेच्या आईचा रोल निभावला होता. एकाच वेळी तरुण पत्नी आणि म्हातारी आई अशी दुहेरी भूमिका निभावण्याचं आव्हान तिने या सिनेमात पेललं.

तर या आहेत बॉलिवूडमधील गाजलेल्या आई. पण अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या कलाकारांच्या आईच्या भूमिकेत दिसल्या आहेत आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे.

Mother's Day 2024: नर्गिस ते अनुष्का; लहान वयात सिनेमात आईची भूमिका गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री
Mother's Day 2023: जीजा आणि आई.. उर्मिलाचा स्पेशल 'मदर्स डे'

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com