अभिनेत्री योगिता चव्हाण हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. जीव माझा गुंतला या मालिकेतून योगिता घराघरात पोहचली. प्रत्येकांच्या घरातील ती एक भाग झाली. जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा प्रत्येकालाच भावली. मालिकेत शांत असलेली अंतरा खऱ्या आयुष्यात मात्र एकदम डॅशिंग आणि कूल आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.