Adish Vaidya Reveals Reason for Leaving ‘Aai Ani Baba Retire Hote Aahet’
esakal
छोट्या पडद्यावरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका प्रेक्षकांचा अल्पवधीतच आवडती झाली. या मालिकेत आई-बाबांच्या रिटारयरमेंट नंतरचं आयुष्य आणि घरगुती जबाबदाऱ्या याची कौटुंबिक गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात आलं. 2 डिसेंबरला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीत आली. परंतु 9 महिन्यातच या मालिकेचा गाशा गुंडाळला. या मालिकेत अभिनेता आदिश वैद्य याने मकरंद किल्लेदाराचं पात्र साकारलं होतं. परंतु त्याने अचानक मालिका का सोडली असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. परंतु त्याने मुलाखतीत याबाबत भाष्य केलय.