Aditi Rao Hydari: 400 वर्षांपूर्वीच्या मंदिरात का केला साखरपुडा? अखेर अदिती राव हैदरीनं सांगितलं कारण

Aditi Rao Hydari: अदितीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये 400 वर्षांपूर्वीच्या मंदिरात साखरपुडा करण्यामागचं कारण सांगितलं.
Aditi Rao Hydari
Aditi Rao Hydariesakal

Aditi Rao Hydari: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. आदितीची 'हिरामंडी' (Heeramandi) ही वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झाली आहे. तसेच तिचा आणि अभिनेता सिद्धार्थचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. अदिती आणि सिद्धार्थ (Siddharth) यांनी 400 वर्षांपूर्वी च्या मंदिरात साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. अशाताच आता अदितीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये 400 वर्षांपूर्वीच्या मंदिरात साखरपुडा करण्यामागचं कारण सांगितलं.

400 वर्षापूर्वीच्या मंदिरात केला साखरपुडा

कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिद्धार्थसोबत अदितीनं एंगेजमेंट केली. आता एका मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच आदितीने तिच्या एंगेजमेंटबद्दल सांगितलं आहे. 400 वर्ष जुन्या मंदिरात साखरपुडा का केला? या प्रश्नाचं उत्तर अदितीनं दिलं आहे.

काय म्हणाली अदिती?

अदितीनं एका मुलाखतीत सांगितलं की, “400 वर्ष जुन्या मंदिरात मला माझ्या आयुष्याच्या खास चॅप्टरला सुरुवात करायची होती. मला तिथे जाऊन पूजा करायची होती आणि तिथेच आमची एंगेजमेंट झाली."

साखरपुड्याबद्दल पसरणाऱ्या अफवांबद्दल देखील अदितीनं सांगितलं. ती म्हणाली, “बऱ्याच अफवा पसरत होत्या, त्यामुळे त्या दूर करण्यासाठी आम्ही आमचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईने मला सांगितले की प्लिज लोकांना सांग कारण कॉल नॉनस्टॉप येत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या साखरपुड्याबद्दल लोकांना सांगितलं."

Aditi Rao Hydari
Aditi Rao Hydari And Siddharth: सिद्धार्थ आणि अदितीनं गुपचूप उरकला साखरपुडा; खास फोटो शेअर करत म्हणाले...

28 मार्च 2024 रोजी अदिती आणि सिद्धार्थ यांनी त्यांचा एक फोटो शेअर करुन त्यांच्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांना दिली. या फोटोमध्ये अदिती आणि सिद्धार्थ हे एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसले.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनी 'महा समुद्रम्' या चित्रपटात एकत्र काम केलं. या दोघांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com