

ADITI SARANGDHAR
ESAKAL
भूमिका कोणत्याही असो कलाकार त्यासाठी मेहनत घेताना दिसतात. मग ते मोठ्या पडद्यावरील कलाकार असोत किंवा छोट्या पडद्यावरचे. आपल्या भूमिकेसाठी कलाकार त्यांच्या वजनापासून ते गेटअप पर्यंत प्रत्येक गोष्टीवर मेहनत करताना दिसतात. अशीच मेहनत झी मराठीच्या अभिनेत्रीने देखील केलीये. ही अभिनेत्री आहे 'सनई चौघडे' मालिकेतील तेजस्वीनी खानोलकर म्हणजेच अभिनेत्री अदिती सारंगधर. अदिती मालिकेत तीन मुलांच्या आईची भूमिका साकारतेय. मात्र जेव्हा मालिका सुरू झाली तेव्हा ती कोणत्याही बाजूने तीन मुलांची आई वाटत नाही अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. तेजस्विनीचा लूक पाहून अनेकजण अदितीला ‘संतूर मॉम’ अशी कॉम्प्लिमेंट देतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या भूमिकेसाठी केलेली मेहनत सांगितलीये.