
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील अनेक नवोदित कलाकार लवकर यशस्वी होत आहेत. काहींनी अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तर काही असेही कलाकार आहेत ज्यांनी अनेक सिनेमे करूनही त्यांना यश मिळालं नाहीये. यातीलच एक अभिनेता म्हणजे झाएद खान. ज्येष्ठ अभिनेता संजय खान यांचा मुलगा असलेल्या झाएदने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे पण त्याचे बरेचसे सिनेमे फ्लॉप ठरले आणि एकच सिनेमा सुपरहिट ठरला.