कुसुम मनोहर लेलेनंतर तब्बल 30 वर्षांनी सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांचा कमबॅक; 'या' नाटकात करणार काम

Sukanya Mone & Dr. Girish Oak New Natak : डॉ. गिरीश ओक आणि सुकन्या मोने तीस वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र नाटकात दिसणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या नव्या नाटकाविषयी.
Sukanya Mone & Dr. Girish Oak New Natak

Sukanya Mone & Dr. Girish Oak New Natak

esakal

Updated on: 

Entertainment News : मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, चोखंदळ प्रेक्षकांसाठी एक कमालीची सुखद आणि भावनिक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यवर्तुळात ज्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाच्या नावाची आणि भक्कम स्टारकास्टची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील दोन महामेरू म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक तब्बल ३० वर्षांनंतर एकाच नाटकात मुख्य भूमिकेत एकत्र येत असून, या बहुप्रतिक्षित नाटकाचे नाव आहे ‘आता थांबवायचं कसं?’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com