
Marathi Entertainment News : सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान निर्माण केलं. यातीलच एक मालिका म्हणजे झी मराठीवरील काहे दिया परदेस. महाराष्ट्रीयन मुलगी आणि उत्तर भारतीय मुलगा यांची प्रेमकहाणी असलेली ही मालिका खूप गाजली. या मालिकेमुळे सायली संजीव आणि ऋषी सक्सेना हे फ्रेश चेहरे मराठी इंडस्ट्रीला मिळाले.