New Marathi Series : ‘आठवी-अ’ च्या यशानंतर आता ‘दहावी-अ

New Marathi Series : आठवी-अ' या लोकप्रिय वेबसिरीजच्या यशानंतर 'दहावी-अ' ही नवी वेबसिरीज 'इट्स मज्जा' आणि 'कोरी पाटी प्रॉडक्शन' तर्फे लवकरच प्रदर्शनासाठी येत आहे.
New Marathi Series :
New Marathi Series :Sakal

New Marathi Series : शाळेचे दिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक हळवा कोपरा असतो. त्या शालेय जीवनाच्या सुखद आठवणींना उजाळा देण्याचे काम ‘इट्स मज्जा’ आणि ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’च्या ‘आठवी-अ’ या वेबसिरीजने केले. ग्रामीण भागातील शालेय जीवनात घडणारे हलके-फुलके प्रसंग या सिरीजने अचूक उभे केले होते. ‘आठवी अ’ सिरीजच्या तुफान यशानंतर ‘दहावी-अ’ ही दुसरी वेबसिरीज प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. नुकतीच या सिरीजच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.

‘आठवी अ’ चे पहिले पर्व २५ भागांचे होते. या पर्वामध्ये ग्रामीण भागातील शाळा, त्यातील विद्यार्थी, तालुक्याच्या मोठ्या शाळेत आठवीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भावविश्व अचूकरीत्या दिग्दर्शक नितीन पवार यांनी मांडले आहे. कथा व संवाद त्यांचेच आहेत. नितीन वाडेवाले यांच्यासोबत त्यांनी पटकथा लिहिली आहे. सातारा जिल्ह्याच्या बोलीचा ग्रामीण बाज सिरीजमध्ये सांभाळला गेला आहे. ‘आठवी-अ’चे निर्माते शौरीन दत्ता म्हणाले की, ‘प्रत्येकाला शाळतले दिवस आठवतील अशी आम्ही याची निर्मिती केली आहे.

New Marathi Series :
Swapnil Joshi: नवऱ्याला अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहून काय असते स्वप्नीलच्या बायकोची प्रतिक्रिया? प्रार्थनाने दिलं उत्तर

दिग्दर्शक नितीन पवार यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील शाळा आणि ते शालेय जीवन आम्ही बारकाव्याने टिपले आहे. यामध्ये अथर्व अदाटे, सृष्टी दणाने, संयोगिता चौधरी, ओम पानस्कर, श्रेयस कटके, रुद्र इनामदार, सत्यजित होमकर यांनी अभिनयही सुंदर केला आहे. याचे सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी तर संगीत मंदार पाटील यांनी केले आहे. अनंत श्रीवास्तव व जेमिन शिगवण हे प्रकल्पप्रमुख आहेत. अंकिता लोखंडे या क्रिएटिव्ह हेड असून आर्थिक जबाबदारी विशाल मेनारिया यांनी पार पाडली.

New Marathi Series :
Anant Radhika Wedding: झेड प्लस सुरक्षा, प्रायव्हेट जेट; अनंत- राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना मिळणार 'हे' कोट्यवधींचं रिटर्न गिफ्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com