
Entertainment News : अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडियाच्या वतीने आज त्यांच्या आगामी, सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या 'निशानची’ या सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित केला. अनुराग कश्यप दिग्दर्शित, हा सर्वोत्कृष्ट देशी मसाला मनोरंजनपट खऱ्या अर्थाने मोठ्या पडद्यावरील भव्य प्रदर्शनाचे आश्वासन देतो. सिनेप्रेमींना आवडणारे प्रत्येक घटक म्हणजे अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडी, मां का प्यार आणि फिल्मी समावेश असलेला तगडा ट्रेलर आहे.