Aishwarya-Avinash Narkar Viral Video: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अविनाश नेहमीच डान्सचे फोटो शेअर करत असतात. त्या दोघांचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. अशातच ऐश्वर्या आणि अविनाश यांनी चिकनी चमेली गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.