

aishwarya narkar
ESAKAL
गेल्या महिन्याभरात स्टार प्रवाहने २ मालिकांची घोषणा केली होती. मात्र २९ मे रोजी वाहिनीने आणखी ६ नव्या मालिकांची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. जणू स्टार प्रवाहला एक वेगळं रूप मिळणार असल्याचं दिसतंय. असाच प्रयोग स्टार प्रवाहने लॉक डाउननंतर केला होता. आणि त्यानंतर या वाहिनीचा टीआरपी गगनाला भिडला होता. स्टार प्रवाहने घोषणा केलेल्या मालिकांमध्ये लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची मुख्य भूमिका असलेली मालिकादेखील आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलाय. मात्र हा प्रोमो प्रेक्षकांना फारसा रुचला नसल्याचं दिसतंय.