

aishwarya narkar
esakal
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. त्या कायम त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. मराठीतल्या एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. या वयातही त्या अत्यंत फिट आहेत. मात्र मध्यंतरी त्यांनी शेअर केलेल्या फोटोंवर त्यांना बोल्ड लूकचा टॅग देण्यात आलेला. अगदी ते फोटो साडीमधले असूनही त्यांना ट्रोलही केलं गेलं. आता या सगळ्यावर ऐश्वर्या यांनी उत्तर दिलंय.