

AISHWARYA NARKAR SCHOOL NAME
ESAKAL
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांनी आपल्या वाटेला आलेली प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडलीये. कधी नायिका बनून तर कधी खलनायिका बनून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आता ऐश्वर्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाहच्या 'आमच्या लाडक्या नाईक बाई' या मालिकेतून ऐश्वर्या पुन्हा एकदा मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांनी आपल्या शाळेचं नाव सांगितलंय.