Aishwarya Rai & Aaradhya Viral Video
esakal
AISHWARYA RAI’S SWEET GESTURE FOR AARADHYA: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नेहमीच तिच्या लेकीसोबत पहायला मिळते. कोणताही कार्यक्रम असो, फॅशन शो असो किंवा शुटिंगचा सेट असो प्रत्येक ठिकाणी आराध्या ऐश्वर्याच्या सोबतच पहायला मिळतेय. परदेशी दौऱ्यावर सुद्धा ऐश्वर्या आराध्याला सोबत घेऊन जाते. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये आराध्या सहलीला परदेशात गेली असताना सगळं काम सोडून ऐश्वर्या एअरपोर्टवर लेकीची वाट बघत थांबली होती. सध्या सोशल मीडियावर या माय-लेकीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.