Aishwarya Rai’s Sweet Gesture Goes Viral
esakal
ऐश्वर्या राय बच्चन सध्या पॅरिसमध्ये फॅशन वीकमध्ये हिस्सा घेण्यासाठी आलीय. 29 सप्टेंबरला ती आराध्यासोबत पॅरिसमध्ये आली आहे. तिचे तिकडचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता ऐश्वर्याचा एक नवीन व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या मेकअप कंटेंट क्रिएटर आदित्य मदीराजूला भेटताना दिसत आहे. यावेळी तिने त्याला मिठी मारत लिपस्टिक सुद्धा गिफ्ट केली आहे. तिचा सध्या त्याचासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.