बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ऐश्वर्याच्या लग्जरी कार टोयोटा वेलफायरचा अपघात झाला आहे. एका बसने ऐश्वर्याच्या गाडीला जोरदार धडक दिली आहे. गाडीला बसने मागून धडक दिली असून सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.