
Marathi Entertainment News : मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नव्या नाटकांचा ओघ वाढत असतानाच जुन्या गाजलेल्या नाटकांचीही पुनर्रचना रसिकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करू लागली आहे. यामध्ये सदाबहार ठरलेले आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेले ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक आता नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवलेले लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी २०१५ साली या नाटकाचा पहिला प्रयोग रंगभूमीवर आणला होता.