
Entertainment News : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकत भारताने जिंकत ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे संपूर्ण देशभर हा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला. बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटीजनेही टीम इंडियाचं अभिनंदन केलं. अभिनेता अजय देवगणनेही सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं.