अजय देवगन पुन्हा एकदा पंजाबी 'सरदारजी'च्या रुपात प्रेक्षकांसमोर पहायला मिळणार आहे. अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुप्रतिक्षित सीक्वलचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 13 वर्षांपूर्वी 'सन ऑफ सरदार'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या ट्रेलरमध्ये अजय देवगन लग्नासाठी काय-काय धाडस करतोय, याची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.