पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून सर्वत्र संतापाची लाट उसळली. भारताकडून 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानला चोख प्रतिउत्तरही देण्यात आलं. परंतु अनेकांकडून 'युद्ध नको' अशी भूमिका मांडताना पहायला मिळाली. अनेकांनी लष्करांच्या कारवाईचं, भारतीय सैनिकांचं भरभरुन कौतूक केलं. दरम्यान आता यातच अजय देवगण यानेही यावर स्पष्ट मत मांडलंय.