

AJINKYA DEO
ESAKAL
मराठी सिनेसृष्टी गाजवणारे लोकप्रिय मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतदेखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या अभिनयाचे आणि त्यांच्या लूकचे अनेक चाहते आहेत. मात्र त्यांना अभिनयाचं बाळकडू त्यांच्या आईवडिलांकडूनच मिळालं होतं. अजिंक्य देव यांचे वडील रमेश देव यांचीही लोकप्रियता प्रचंड होती. आईवडील दोघेही सुपरस्टार असले तरी त्यांच्या घरी अतिशय साधं मराठमोळं वातावरण होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजिंक्य यांनी त्यांच्या वडिलांच्या लोकप्रियतेचा एक किस्सा सांगितलाय.